शिवजन्मा पूर्वीचा महाराष्ट्र
शिवाजी महाराजांचा जन्मापूर्वी महाराष्ट्रात राजेशाही व वतनदार घराण्यांची सत्ता होती. हे राजे जनतेच्या हिताचा विचार न करता आपआपसात युद्ध करून प्रदेश काबीज करणे हे त्यांना जास्त पसंतीचे होते.
महाराष्ट्रातील बराचसा भाग हा निजामशाही व आदिलशाही ह्या दोन गटांनी आपापसात वाटून घेतला होता. अहमदनगर मध्ये निजामशाही तर विजापूर चा भाग हा आदिलशाही कडे होता.
देशावर आणि रयतेवर त्यांचे प्रेम नव्हते.प्रेम होते ते फक्त सत्तेवर आणि जहागिरीवर त्यामुळे रयतेचे खूप हाल होत असत. जनतेच्या हिताचा विचार करणारी सत्ताच अस्तित्वात नव्हती.
निजामांच्या दरबारी शिवाजी महाराजांचे वडील शाहजी राजांना मोठा मान होता.पुढे मोघल बादशाहने(मोघलानी) निजामशाही वर हल्ला करून निजामशाही जिंकण्याचा डाव आखला.त्यात विजापूरच्या आदिलशहा ने देखील मोघल बादशहा बरोबर हात मिळवणी केली.
तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी निजाम मलिक अंबर आणि शाहजी राजे (इतिहासातील पत्रांमध्ये शाहजी असा उल्लेख आढळतो) मोठ्या ताकतिने लढले.
ही लढाई अहमदनगर मधील भातवडी येथे झाली.या लढाईत शाहजी राजानी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली.ती इतकी कि स्वतः मलिक अंबर ला त्याच्या विषयी मनात असूया तयार झाली. या आणि अश्या अनेक कारणांनमुळे शाहजी राजानी निजामशाही सोडून आदिलशाही मध्ये प्रवेश केला.
आदिलशहाने त्यांना सरलष्कर किताब देवून त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीतील मलिक अंबर मृत्यू पावल्यामुळे त्याचा मुलगा फतेखान हा निजामशाही चा वजीर झाला.
तेव्हा पासून निजामशाहीला उतरती कळा लागली. परकीय आक्रमणाचा धोका निर्माण झाल्याने निजामशाही च्या आईने शाहजी राजे ह्यांना साकडे घातल्याने ते पुन्हा निजामशाहीत परतले.
शिवजन्म आणि नव्या अध्यायाला सुरुवात
शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस शाहजी राजे मोठ्या अडचणीत सापडले होते. निजामांच्या भीती प्रमाणे मुघलांनी दख्खन सर करण्यासाठी (म्हणजेच निजामशाहीवर विजय मिळवण्यासाठी) मोठी सैन्याची फौज रवाना केली होती.
शाहजी राजांच्या जहागारीतले गाव पुणे आदिलशहाने नेस्तनाभूत केले. त्याच दरम्यान मा जिजाऊ ह्या गरोदर होत्या. अश्या अडचणीच्या काळी मा जिजाऊना कुठे ठेवायचे हा मोठा प्रश्न शाहजी राजान समोर उभा राहिला.
भक्कम दरवाजे आणि चारही बाजूनी मजबूत तटबंदी असलेल्या पुण्या जवळील जुन्नर ह्या ठिकानी वसलेल्या शिवनेरी किल्ल्यावर मा साहेबाना ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या संपूर्ण रक्षणाची जबाबदारी किल्याचे किल्लेदार विजयराज ह्यांनी घेतली.
आणि अखेर तो दिवस उजाडला किल्यावर सर्वत्र सनई चौघडे वाजू लागले. फाल्गुन वैद्य तृतीय शके १५५१ इंग्रजी वर्षांप्रमाणे १९ फेब्रुवारी १६३० रोजी मा जीजाऊच्या पोटी पुत्र जन्माला आला.किल्यावरील शिवाई देवीच्या नावावरून बाळाचे नाव शिवाजी ठेवले.
लहानग्या शिवरायांचे बालपण आणि शिक्षण
बालपणात मा जिजाऊनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. जिजाऊ शिवरायांना शूरांच्या आणि त्यांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगत असत. महाराजांना ही त्यात खूप रस होता. मोठे होऊन त्यांच्या सारखे पराक्रम करावेत असे महाराजांना ही वाटत असे.
त्याबरोबर जीजाऊनि त्यांच्या वर धर्माचे देखील संस्कार केले. त्या महाराजांना राम,कृष्ण,भीम अश्या देवी देवतांच्या गोष्टी सांगत असत. संत नामदेव ज्ञानेश्वरांचे अभंग म्हणून दाखवत असत.
मा साहेबांच्या अश्या चौकस संस्कार मुळे महाराजांनी कधीच माणसा माणसात भेदभाव केला नाही. शिवबा गरीब मावळयांच्या झोपडीत जाऊन त्यांच्या बरोबर कांदा भाकर खात असत. मावळ्यांची मुले शिवबा बरोबर खेळायला येत असत. त्यांच्या मुलांना देखील शिवबा फार आवडायचे. मावळ्यांची मुले विविध प्राणी आणि पक्ष्यांचे हुबेहूब आवाज काढत.
मा जिजाऊ ह्या त्यांच्या जीवनातील पहिल्या गुरु महाराजांना पुढे अनेक गुरु चा सहवास लाभला व शिक्षकांच्या मार्गदर्शना प्रमाणे महाराजांनी शिक्षणातच नाही तर युद्धकलेत देखील प्राविण्य प्राप्त केले.
शाहजी राजांनी शिवबांच्या शिक्षणा साठी अतिशय हुशार शिक्षकांची नेमणूक केली. शाहजी राजे स्वतःसंस्कृतचे विद्वान पंडित होते. वयाच्या ७ व्या वर्षी शिवबांच्या शिक्षणाचा प्रारंभ झाला.
युद्धकला शिकण्यासाठी त्यांनी दादोजी कोंडदेव यांची नेमणूक केली. हे महाराजांचे दुसरे गुरु. घोड्यावर बसणे, दांडपट्टा चालवणे, तलवार चालवणे अश्या विद्या शिकण्यास सुरवात झाली आणि काहीच वर्षात म्हणजेच वयाच्या १२ व्या वर्षा पर्यंत महाराजाना विविध विद्या आणि कलांचा परीचय झाला.
शिवाजी महाराजांचा विवाह सोहळा
त्या काळी लहानपणी लग्न करण्याची पद्धत होती. महाराजांन साठी मुली बघण्यास सुरवात झाली. त्यात एक मुलगी महाराजांना पसंत पडली तिचे नाव सईबाई फलटन च्या नाईक निंबाळकर घराण्यातील ती मुलगी. १६ मे १६४० रोजी पुण्यातील लाल महाल येथे मोठ्या थाटामाटात महाराजांचा विवाह सोहळा पार पडला.
शपथ स्वराज्य स्थापनेची
शाहजी राजे विजापूरच्या दरबारी सरदार होते. परंतु आपल्या वतनदारी साठी सुलतान दरबारी गुलामगिरी करणे हे शिवबाना योग्य वाटत न्हवते.
कारण परकीय सुलतानी राजाच्या एकमेकांवरील आक्रमणामुळे रयतेचे खूप नुकसान होत असे. अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असत व मुलखाची संपूर्ण धूळधाण होत. एवढे सहन करून देखील आपल्या पदरी फक्त गुलामगिरी हे महाराजाना काही मान्य न्हवते.
त्यामुळे महाराजांनी १६४५ रोजी म्हणजे वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी पुण्या जवळील रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या सवंगड्यान बरोबर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
त्या नतर ते लालमहाली जीजाऊनच्या भेटी साठी गेले घेतलेल्या शपथे बदल त्यांनी मा जीजाऊना सांगितले. जीजाऊना खूप आनंद झाला.आपण पाहिलेले स्वप्न हे बाळराज्याच्या हातून पूर्ण होणार ह्याची आशा व विश्वास त्यांना होता.
शिवबांच्या मोहिमेला सुरवात व राजमुद्रेची निर्मिती
शिवरायांनी आसपासच्या दार्याखोऱ्यातल्या सवंगड्याना एकत्र करायला सुरवात केली. जवळचा परिसर तसेच गडकिल्ले न्याहाळायला सुरवात झाली. गडांवरील चोर वाट, घाट, भुयारे ,तळघरे, दारुगोळा, हत्यारे यांची खडानखडा माहिती मिळवली.
बारा मावळातीला देशमुख हे वतनासाठी एक आपआपसात भांडत असत महाराजांनी त्याच्या भेटी घेऊन त्यांच्यात असणाऱ्या मतभेदांना दूर करून हिंदवी स्वराज्याची भावना पेरली.
मावळ खोऱ्यातील बाजी पासलकर ,बांदल, हेंबतराव शिळमकर, विठोजी शितोळे, जेधे, पायगुडे अश्या सर्व देशमुख घराणे महाराजांच्या विचारानी भारावून गेले. तरुण मावळे शिवरायांन साठी जगायचे शिवरायांसाठी मरायचे असे मानू लागले. मावळात सर्वत्र महाराजांच्या दूरदृष्टीकोनाचे कौतुक होऊ लागले.
महाराजांनी सर्वच मावळातील लोकांना, वतनदाराना एकत्र करून हिंदवी स्वराजाच्या मोहिमेची पहिली मुर्हूत मेढ रोवली.
शाहजी राजांनी शिवरायांना मावळातील जहागिरी दिली होती.शिवरायांच्या नावाने जहागिरीचा कारभार सुरु झाला होता. शाहजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. स्वतंत्र राजमुद्रा म्हणजे स्वराज्य स्थापनेचा संकेतच होता.
हिंदवी स्वराज्याचे पहिले तोरण – तोरणा किल्ला
रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली खरी परंतु ही मोहीम वाटते तेवढी सोपी मुळीच नव्हती हे महाराजांना देखील ठाऊक होते. स्वराजाच्या चारही बाजूला गनिमानी अजगरां सारखा वेढा घातला होता.
दिल्ली चा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिददी यांनी विशाल अशा फौजा, दारुगोळा घेऊन स्वराज्य भोवती आपला वेढा टाकून बसले होते.
आपल्याच राज्यात आपण गुलामगिरी स्वीकारून परप्रांतीयान साठी काम करणे हे महाराजांना मान्य न्हवते. हाच विचार मनात घेऊन आपल्या सवंगड्यान बरोबर महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि पाहिलेले स्वप्न छातीशी घेऊन महाराजांनी स्वराज्याचे(स्वतःचे राज्य)रणशिंग फुंकले.
शिवरायांच्या जहागीरीतले म्हणजेच जहागिरीच्या परिसराती किल्ले हे विजापूरच्या दरबारातील अधिकाऱ्याच्या ताब्यात होते. ज्याचे किल्ले त्याचे राज्य कारण किल्ले हातात असले कि आजूबाजूच्या प्रदेशा मध्ये सत्ता चालते हे शिवरायान चांगलेच ठाऊक होते. तेव्हा एखादा जहागिरीच्या प्रदेशातील भक्कम किल्ला लवकरच काबीज केला पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले.
तेव्हा त्याच्या नजरेत आला तो किल्ले तोरणा. किल्यावरील ढिला पहारा व आदिलशाह चे किल्ल्याकडे झालेले दुर्लक्ष पाहता त्यांनी हा किल्ला काबीज करायचे ठरवले. पुण्या पासून चौसष्ट किलोमीटर अंतरावर असलेला कानद खोर्यातील हा किल्ला भक्कम तर होताच परंतु स्वराज्याच्या दृष्टीने महत्वाचा देखील होता.
हे ओळखून निवडक मावळ्यांची महाराजांनी निवड केली त्यात तानाजी मालुसरे, येसाजी कंक अश्या निष्ठावान व विश्वासू मावळ्यांना सोबत घेऊन ते कानद खोर्यात उतरले.
मावळ्यानी आपल्या चपळाईने व सिंहाच्या छातीने हर हर महादेव चा जयजय कार करत किल्ला भरभर सर केला. तलवार हाती घेऊन परकीय सैन्याशी दोन हात करत हा किल्ला महाराजानी इसवी सन १६४७ मध्ये स्वराज्यात घेतला. महाराजांनी त्याला प्रचंडगड असे नाव दिले. तेव्हा महाराज फक्त १६ वर्षांचे होते. हा किल्ला ताब्यात घेऊन महाराजांनी स्वराज्याचे पहिले तोरण बांधले.
स्वराज्याची पहिली राजधानी – राजगड
तोरणा किल्ला जिंकल्या नंतर गडाच्या दुरुस्तीचे काम महाराजांनी हाती घेतले. मावळतीला सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेत महाराजांनी गडाच्या डागडुजीचे काम सुरु केले.
दुरुस्ती दरम्यान गडावर मावळ्यांना गच्च मोहरानी भरलेल्या चार घागरी सापडल्या. हे धन भवानी मातेच्या आशिर्वादनेच आपल्याला मिळाले आहे.
आपल्या कार्यात भवानी माता आपल्या सोबत आहे असे त्यांना वाटले.ते सर्व धन मावळ्यांनी महाराजान कडे सुपूर्त केले.
हे धन आपल्याला स्वराज्याच्या पुढील कार्यासाठीच भवानी मातेने दिले आहे. त्याचा वापर हा स्वराज्याच्या पुढील जडणघडनीसाठीच करायला हवा असे महाराजानी ठरवले.
महाराजांनी त्यातून किल्ल्याची डागडुजी, तसेच शस्त्र, दारुगोळा ची खरेदी इ. कामा करिता त्याचा उपयोग केला. उरलेल्या धनाचा वापर एका विशेष मोहिमे करिता करायचा असे महाराजांनी ठरवले व ती मोहीम होती.
तोरणा किल्ल्याच्या जवळच असलेल्या मुरुंबदेवाचा गड काबीज करणे. हा गड स्वराज्यात घेणे हे महाराजांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते. महाराजांनी हा गड अगोदरच हेरून ठेवला होता. स्वराजाच्या राजधानी करिता हा किल्ला ताब्यात घ्यायचा असे महाराजांनी ठरवले.
गडावरील ढिला पहारा व सुलतानांचे झालेले दुर्लक्ष ह्याचा फायदा घेत महाराजांनी निवडक मावळ्यान सोबत तो गड १६४५ मध्ये स्वराज्यात घेतला व त्यालाच महाराजांनी राजगड असे नाव दिले. स्वराजाच्या पहिल्या राजधानीचे तोरण बांधले गेले.
जावळीचे मोरे व रायरीचा किल्ला
शिवरायांची कीर्ती सर्वदूर पसरू लागली होती महाराजांचे होणारे कौतुक सर्वांनाच आवडले नाही काही लोकांना त्याचा भरपूर हेवा वाटे. स्वराज्याच्या कार्यात आडव्या येणाऱ्या स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त गरजेचे होते कारण त्या मुळे स्वराज्याच्या कामी अढथळे निर्माण होऊ लागले.
शिवरायांच्या जवळच्या नातलगांपैकी एक असणाऱ्या संभाजी मोहित हे सुपे परगण्यातील होते. त्यांनी शिवरायान विरुद्ध कारवाया करण्यास सुरवात केली. महाराजांनी त्यांना पकडून कर्नाटक प्रांतात धाडले
तसेच फलटण चे बजाजी नाईक निंबाळकर हे शिवरायंचे मेहुणे महाराजांना त्यांच्या ही विरोधात जाऊन लढाया कराव्या लागल्या. स्वराज्य पुढे महाराजांनी नातेगोते पहिले नाही.
महाराजांची होणारी कीर्ती जावळीच्या मोऱ्यांना देखील आवडली नाही. मोरे हे विजापूरच्या आदिलशहा चे जहागीरदार होते. आदिलशहा ने त्यांना चंद्रराव असा किताब दिला होता.
जावळीचा प्रदेश हा अत्यंत घनदाट अरण्याचा. तेथे दिवसा सूर्यकिरणांना देखील वावर नव्हता. सर्वत्र कोल्हे, लांडगे, सिंह, वाघ अश्या हिंस्त्र पशूंचा वावर होता. त्यामुळे मोऱ्यांच्या वाट्याला कोणी जात नसे.
१६४५ साली दौलत राव मोरे मरण पावले त्यानंतर त्याच्या वारसान मध्ये गादी साठी भांडण सुरु झाले ह्यात महाराजांनी त्यांच्या वारसान पैकी यशवंतराव ह्यांना गादी वर बसण्यासाठी मदत केली त्यावेळी त्यांनी महाराजान खंडणी देण्याचे देखील कबुल केले व यशवंत राव हे जावळीच्या गादी वर चंद्रराव म्हणुन विराजमान झाले.
परंतु गादी मिळताच चंद्रराव सारे विसरून गेले.त्यांनी कोणती खंडणी कोणता करार असे प्रश्न करायाल सुरवात केली. आजूबाजूच्या प्रदेशावर आक्रमण करून रयतेचा छळ करण्यास सुरवात केली.वेळीच त्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे होते
जावळीचा प्रदेश तसा प्रचंड मोठा व मोर्यांचे सैन्य ही मोठे मोठ्या हुशारीने महाराजांनी जावळी वर स्वारी केली महिनाभर मोऱ्यांनी झुंज दिली त्यात त्यांचे बरेच सैन्य मारले गेले. त्यानंतर यशवंतराव आपल्या कुटुंबाला घेऊन रायरीचा किल्यावर गेले. महारजांनी किल्याला कडक वेढा दिला सुमारे तीन महिने हा पहारा तसाच राहिला शेवटी यशवंत राव महाराजाना शरण गेले. जावळीच्या प्रदेशा बरोबरच रायरीचा किल्ला देखील महाराजांच्या स्वराज्यात आला.
एवढा प्रचंड मोठा किल्ला स्वराज्यात आल्याने महाराजांना धन्य वाटले.पुडे महाराजांनी रायरी किल्याचे नाव रायगड असे ठेवले. त्यानंतर महाराजांनी जवळच्या भोरप्या डोंगरावर आणखी एक किल्ला बांधला त्याचे नाव प्रतापगड.
अफझलखानाचा वध
महाराजांच्या वाढत्या पराक्रमांचा हादरा आदिलशाही ला बसला.आदिलशाही च्या दरबारातील बडी साहेबीन हिने दरबारात खडा सवाल केला सांगा कोण पकडून आणेल शिवाजी ला ? कोणी ही पुढे यायला धजावला नाही परंतु धीप्पाड देहाचा एक सरदार लवून मुजरा करत पुढे आला. पानाचा विडा उचलत तो म्हणाला शिवाजी कुठला शिवाजी त्याला मी जिवंत पकडून या दरबारात हजर करतो. त्या सरदाराचे नाव होते अफझलखान.
स्वराज्यावर मोठे संकट चालून आल्याची बातमी महाराजान कळाली. अफझलखानाचा बंदोबस्त करायचा असेल तर शक्ती पेक्षा युक्ती जास्त श्रेष्ठ ठरेल हे महाराजांनी ओळखले होते.अफझलखाना च्या सैन्या समोर आपले सैन्याचा टिकाव लागणार ह्याकरिता महाराजांनी एक युक्ती लढवली.
भोरप्या डोंगरावर बांधलेल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाला भेटी साठी निमंत्रित केल. ह्या भेटीत खान कोणत्या ही प्रकरचा दगा आपल्या बरोबर करू शकतो हे महाराजांनी ओळखून त्याची पूर्व तयारी त्यांनी केली, त्यांच्या शक्यते प्रमाणे तसे घडले ही परंतु महाराजांच्या युक्तीने खानाचा डाव हुकला. महाराजांनी पोटात वाघ नखाचा मारा करून खानाचा जागीच वध केला.
शौर्याने माखलेली पावनखिंड
अफझलखाना च्या मृत्यू नंतर चिडलेल्या आदिलशहाने सिद्दी जोहर ह्या सरदाराला महाराजांना पकडण्यासाठी धाडले. आपल्या बापाच्या मृत्यू चा बदला घेण्यासाठी अफझलखानाचा मुलगा फाजलखान देखील त्याच्या बरोबर निघाला.
सिद्दी ला महाराज पन्हाळ गडावर असल्याचे कळताच त्याने पन्हाळ गडाला चौफेर वेढा घातला. व महाराजांना गडावरच अडकवून ठेवले. तेव्हा महाराज खूप कमी मावळ्यान सोबत गडावर होते.
पावसाला सुरुवात झाली कि सिद्दी आपला वेढा उठवेल असे महाराजान वाटले परंतु तसे झाले नाही. महाराजांनी चकवा देवून निसटू नये ह्या साठी त्याने आपला पहारा आणखीनच कडक केला. त्यातून निसटण्यासाठी महाराजांनी एक युक्ती केली.
व त्या नुसार महाराजांनी पन्हाळा सोडला देखील पुढे महाराजांना शत्रूच्या तावडीत न सापडता आपल्या सैन्यासह विशाळगडावर सुखरूप पोहचायचे ठरवले होते. परंतु महाराज गडावरून निसटल्याची चाहूल शत्रूला लागताच त्यांनी त्यांचा पाठलाग सुरु केला. पुढे महाराजांना विशाळगडा पर्यंत पोहोचणे मुश्कील वाटू लागले.
तेव्हा महाराज बाजीप्रभुना म्हणाले बाजी चला मागे वळू व शत्रूशी दोन हात करू. परंतु बाजीप्रभूंनी त्यांना असे करू दिले नाही महाराज लाख मेले तरी चालतील पण लाखांना जागवणारा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणत महाराजान चा निरोप घेत त्यांना निवडक मावळ्यान सोबत विशाळगडाकडे धाडले.
जो पर्यंत तुम्ही विशालगडावर पोहचून तोफा वाजवून पोहोचल्याचा संकेत देत नाही. तो पर्यंत ह्या खिंडीत मी काही मावळ्यान सोबत शत्रूला अडवून धरेल असे म्हणत त्यांनी शत्रूच्या बलाढ्य सैन्याशी दोन हात केले.
महाराज सुखरूप विशाळगडावर पोहोचताच त्यांनी तोफांचा आवाज केला. तो आवाज ऐकल्या नंतरच बाजीप्रभूंनी आपले प्राण सोडले. ही लढाई १३ जुलै १६६० रोज घडली. तसेच ही लढाई इतिहासातील एक महत्वाची लढाई म्हणुन ओळखली जाते. जी खिंड बाजीप्रभूंच्या रक्ताने नाहली त्याच खिंडीला महाराजांनी पुढे पावन खिंड असे नाव दिले.
शायीस्ताखानची तीन बोट
आदिलशहाचे सर्व प्रयत्न शिवाजी महाराजान समोर फोल ठरले. शेवटी आदिलशहाने महाराजान बरोबर तह केला आणि त्यांचे स्वतंत्र राज्य मान्य केले.
एक बाजू शांत होताच महाराज पुढे उत्तरेतील मुघलांकडे वळाले. त्या वेळी दिल्लीचा मुघल बादशहा औरंगजेब होता. मुघलांच्या मुलखावर स्वाऱ्या करून त्यांचे बरेच प्रदेश महाराजांनी काबीज केले त्यामुळे औरंगजेब चिडला त्यांने शिवाजी महाराजाचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांचा मामा म्हणजेच शायीस्ताखान ह्याला पुण्याला पाठवले.
लाखोंचे सैन्य, घोडे ,हत्ती घेऊन शायीस्ताखान सासवड मार्गे पुण्यात आला. त्याने पुरंदरच्या किल्याला वेढा दिला परंतु मराठे फार चतुर शायीस्ताखान च्या सैन्याला त्यांचा निभाव लागणे प्रचंड कठीण मराठ्यांनी त्यांच्या वर सत्तत गनिमी स्वाऱ्या केल्याने त्यांचे सैन्य त्रस्त झाले व त्यांनी पुरंदरचा वेढा उठवला.
पुहे खानाने लाल महालाल वेढा घातला लाल महालाच्या आजूबाजूच्या गावात शस्त्र घेऊन फिरण्यास देखील मनाई होती. इतक्या कडक पहाऱ्यात देखील शिवरायांनी शायीस्ताखानास धडा शिकवायचे ठरवले.
महाराजांनी दिवस निवडला ५ एप्रिल १६६३ ची रात्र. वाजत गाजत चालेल्या लग्नाच्या वरातीत महाराज आपल्या सैन्य सोबत सामील झाले. शायीस्ताखानाने लाल महाल निवडल्याने व तिथेच तळ ठोकून बसल्याने महाराजांना त्याच्या पर्यंत पोहोचणे अधिकच सोपे झाले.
कारण महाराजांना लाल महालाची इत्यंभूत माहिती होती. महाराजांचे संपूर्ण बालपण हे लाल महालातच गेले होते. त्याचा फायदा महाराजांना झाला महाराज व त्यांचे सैन्य लग्नाच्या वारातीतून पुढे लाल महालाकडे वळाले.
महालाला मोठे भगदाड पाडून ते आत शिरले. झोपेत असलेले खानाचे सैन्य जागे झाले. सैन्याशी दोन हात करत महाराज शायीस्ताखानाच्या महालात शिरले.
झोपेत असलेळा खान महाराजांना पाहून खिडकीवाटे पळ काढणार तेवढ्यातच म्यानातुन आपली तलवार उपसत महाराजांनी त्याच्या बोटांवर वार केला व त्यात खानची तीन बोटे कापली गेली.
आज शिवाजीने आपली तीन बोटे कापली उद्या तो आपले शीर देखील कापेल ह्या भीतीने खानाने पुण्यातून पळ काढला.
सुरतेवर छापा आणि शाहजी राजेंचा मृत्यू
शायीस्ताखाना च्या प्रकरणा नंतर महाराज गप्प बसले नाहीत त्यांनी मुघलांना चांगला धडा शिकवण्या करिता मुघल काळातील अतिशय सदन अश्या सुरतेची बाजारपेठ लुटण्याचा कार्यक्रम आखला.
महाराजांनी सुरत लुटली व तेथून लाखोंच्या मोहरा व सोने मिळवले. हे सर्व महाराजांनी नीतिमत्तेने पार पाडले. कोणत्या ही स्त्रीला किवा इतर धर्मांच्या देवळांना त्यांनी हात देखील लावला नाही.
सुरतेच्या मोहिमे वरून परतत असताना महाराजाना एक खूप दुखत बातमी कर्नाटक प्रांतातून आली. सन १६६४ मध्ये शाहजी राजे ह्यांचे शिकारीच्या दरम्यान अपघाती निधन झाले. महाराजांनी मा साहेबाना धीर देवून त्यांना आलिंगन देत दुखातून सावरले.
पुरंदरचा तह
सुरतेच्या झालेली लुट मुघल बादशहा औरंगजेबाला कळताच तो रागाने लाल झाला. महाराजांचा कैद करण्यासाठी आपला सेनापती मिर्झाराजे जयसिंग व सरदार दिलेरखान ह्याला सोबत पाठवले.
पुरंदर हा भक्कम आणि शिवरायांच्या स्वराज्यातील महत्वाचा किल्ला आहे हा किल्ला घेतल्या शिवाय मराठ्यांना झुकवता येणार नाही ह्याची माहिती दिलेरखानाला होती.
त्याने लाखोंच्या सैन्याला घेऊन पुरंदर ला वेढा घातला. पुरंदरचा किल्ल्यावर तोफांचे हल्ले करत त्याने माची काबीज केली. दिलेर् खानाचे सैन्य माचीत घुसले. तेव्हा पुरंदरचे किल्लेदार मुरारबाजी होते.
अतिशय चपळ व जिद्दी मावळा माचीचा बुरुज ढासळ्याने निवडक ५०० मावळ्यान सह शत्रूवर चालून जायचे त्यांनी ठरवले त्यात मराठे व मुरारबाजी मोठ्या ताकतीने लढले परंतु मुरारबाजींच्या कंठात बान लागून ते जमिनीवर धारतीर्थी पडले.
सतत होणारे सैन्याचे व रयतेचे नुकसान विचारात घेता महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग ह्याची भेट घेण्याचे ठरवले व मुघलांशी महाराजांनी तह केला. त्याच वेळेस शिवरायांनी आग्र्याला जाऊन बाद्शाची भेट घ्यावी असे देखील ठरले.
पुरंदरच्या तहा वेळी ठरल्या प्रमाणे महाराजांनी आग्र्यास जाऊन बादशहाची भेट घेण्याचे निश्चित केले. संपूर्ण स्वराज्याचा कारभार महाराजांनी जिजाऊनच्या हाती सोपवला.सोबत बाल संभाजी राजे आणि निवडक सरदारान सह ते बादशाच्या भेटीस गेले. तेव्हा औरंगजेब बद्शाहाच ५० वा वाढदिवस होता.
महाराजांचे चातुर्य आणि बादशहाच्या हातावर तुरी
पुरंदरच्या तहा वेळी ठरल्याप्रमाणे महाराजांनी आग्र्यास जाऊन बादशहाची भेट घेण्याचे निश्चित केले.संपूर्ण स्वराज्याचा कारभार महाराजांनी जिजाऊंच्या हाती सोपवला.सोबत छोटे संभाजी राजे आणि निवडक सरदारांसह ते बादशाच्या भेटीस गेले तेव्हा औरंगजेबाचा ५० वा वाढदिवस होता.
महाराज जेव्हा औरंगजेबाच्या महालात गेले तेव्हा औरंगजेबाने त्यांना मागील रांगेत उभे केले आणि शिवरायांचा अपमान केला अपमान सहन न झाल्यामुळे महाराजांनी तळप तिथून निघण्याचा निर्णय घेतला आणि ते आपल्या मुक्कामावर गेले. औरंगजेबाने दगाबाजी करत महाराजांच्या मुक्कामाच्या ठिकाणी भोवती शिपायांचा पहारा बसवला.
महाराजांसोबत असणारे अनेक जण या गोष्टीने चिंतीत झाले दिवसांमधून दिवस जात होते पण बादशहाने आपला पहारा कडक ठेवला होता. या कैदेतून सुटण्यासाठी एकदा शिवरायांनी आजारी पडल्याचे नाटक केले त्यांच्या पोटात भयंकर कळा येऊ लागल्या. हा जर बरा व्हावा म्हणून साधू आणि मौलवी अशा लोकांना मिठाईचे पेटारे पाठवण्यात शिवरायांनी सुरुवात केली.
सुरुवातीला तिथे बादशहाचे असणारे पहारेकरी ते पेटारी उघडून पाहत असत पण नंतर नंतर ते कंटाळले आणि याचाच फायदा महाराजांनी उचलला आणि आपल्या जागी हिरोजीला झोपवले आणि संभाजीराजांसोबत पेटारात बसले पुढे ठरलेल्या ठिकाणी ते सुखरूप पोहोचलेत्या दिवशी तारीख होती १२ मे १६६६. दुसऱ्या दिवशी बादशहाला हे सगळं कळताच त्यांनी सगळीकडे हेअर पाठवले पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि अशा प्रकारे महाराजांनी बादशहाच्या हातावर चतुराईने तुरी दिल्या.
गड आला, पण सिंह गेला
दिनांक ४ फेब्रुवारी सन १६७० मध्ये पुण्याजवळील कोंढाण्यासारखा बळकट किल्ला स्वराज्यात असावा अशी जिजाऊंची आणि शिवरायांची इच्छा होती पण कोंढाणा जिंकणे अतिशय अवघड असल्यामुळे या कामगिरीसाठी कोणाला निवडावे असा प्रश्न सर्वांसमक्ष उभा राहिला.
त्यावेळेस उमरठे गावचा सुभेदार तानाजी मालुसरे हा हिंमतवान गडी शिवरायांचा साथीदार त्याच्या मुलाचे लग्न ठरले म्हणून महाराज आणि मासाहेब यांना लग्नाला बोलवण्यासाठी शिवरायांकडे गेला त्यावेळेस शिवराय उन्हाळ्याच्या कामगिरीवर जाणार आहेत असे कळतात तानाजी म्हणाला “आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे.
कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार मला आशीर्वाद द्या.” कोंढाण्यावर लढाईला सुरुवात झाली.तानाजी सिंहासारखा लढत होता शेवटी तानाजी धारातीर्थी पडले. जिजामाता व शिवरायांनी बातमी कळली त्यांना खूप दुःख झाले गड तर ताब्यात आला पण तेव्हा शिवराय म्हणाले गड आला पण सिंह गेला.
राजाभिषेकाचा अभूतपूर्व सोहळा
हिंदवी स्वराज्य खऱ्या अर्थाने निर्माण झाले आहे हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचायला हवे या हेतूने शिवरायांनी राज्याभिषेकाची योजना आखली. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली रायगड हा मजबूत किल्ला होता आणि त्यावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. राज्याभिषेकासाठी शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करुन घेतले, गंगा,सिंधू,यमुना,गोदावरी, कृष्णा,नर्मदा व कावेरी या सात नद्यांचे आणि समुद्राचे पाणी आणले गेले,अनेक विद्वानांना आमंत्रित करण्यात आले होते.
राज्याभिषेकाचा महामंगल दिवस होता सगळीकडे मंगलमय वातावरण होते.गागा भट्टानी छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले “क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपतींचा विजय असो”. आणि सर्व महाराष्ट्रात शिवरायांचा जयजयकार झाला.अशाप्रकारे सण सोळाशे १६७४ मध्ये शिवरायांचा राज्याभिषेक झाला.
विचार दक्षिणेतील मोहिमांचा
राज्याभिषेकानंतर आदिलशाही मोडकळीस आल्यामुळे शिवरायांना त्याची भीती नव्हती परंतु मुघलांना ताब्यात ठेवण्यासाठी दक्षिणेत सुद्धा आपलं काहीतरी ठाण हवं म्हणून त्यांनी दक्षिण भागातल्या ताब्यात घेण्याचे ठरवले. शिवराय कर्नाटकात जाण्यासाठी निघाले.
सुरुवात अबुल हसन कुतुबशहा यांच्या गोवळकोंड्याच्या भेटीने झाली.गोलकुंडा ही कुतुबशाची राजधानी होती त्यांनी महाराजांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केली होती त्यानंतर पुढे शिवरायांनी जिंजीचा किल्ला मिळवण्याचे ठरवले आणि कित्येक महिने त्या किल्ल्याला वेढा दिला या कष्टाचे फळ म्हणून फक्त जिंजीच नाही तर एकोणवीस लक्ष उत्पन्नाचा प्रदेश आणि कित्येक छोटे-मोठे किल्ले शिवरायांनी दक्षिणेत जिंकले.
जाणत्या राजाचे जाणते व्यवस्थापन
छत्रपती शिवाजी महाराजांनी वनदुर्ग गिरीदुर्ग आणि जलदुर्ग अशा तीनही प्रकारांमध्ये किल्ले बांधले. स्वराज्याचे शत्रूंपासून संरक्षण करण्यासाठी किल्ल्यांचे महत्त्व त्यांना माहीत होते. महाराजांकडे सुमारे 300 किल्ले होते.
लढाई करायची म्हणजे त्यासाठी तोफा हवेत दारूगोळा हवा यासाठी सुद्धा उपाय म्हणून पुरंदर भीमगड यांसारख्या काही गडांवर शिवरायांनी तोफा तयार करण्याचे कारखाने सुरू केले होते त्यामध्ये लोखंड पितळ तांबे या धातूंपासून तोफा तयार केल्या जात असत.
हळूहळू निर्माण झालेला सागरी शत्रूंचा धोका ओळखून राजांनी स्वतंत्र असे आरमार निर्माण केले जात त्यांनी अनेक लहान-मोठी जहाजे नावा तयार केल्या आणि स्वराज्याच्या आरमारत कोळी भंडारी आगरी यांसारख्या लोकांमध्ये या अरमारातल्या सैनिकांची कामे देऊ केली.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वराज्यातील राज्यकारभार कोणत्याही अडचणी शिवाय व्यवस्थित चालावे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्यकारभाराची एकूण आठ खात्यांमध्ये विभागणी केली यालाच शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ असे म्हणत असत.
स्वराज्यातील काळा दिवस
छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षापासून गोरगरिबांसाठी कल्याण कार्य सुरु केले होते.पण सामान्यांचा जाणता राजा सर्वांसाठी झटून, ०३ एप्रिल १६८० रोजी अनंतात विलीन झाला.शिवराय सर्वांना सोडून गेले असतील तरी त्यांचे कार्य हे महान आहे.वर्षानुवर्ष सर्वचजण त्यांनी महाराष्ट्राप्रती केलेले कार्य लक्षात ठेवू यात शंकाच नाही.